Ad will apear here
Next
कांदळी येथे महिलांना गॅस संचाचे वाटप
पडघा येथे गॅस संचाचे वाटप करताना मान्यवर.

पडघा : भिवंडी तालुक्यातील कांदळी व बोरीवली जिल्हा परिषद गटातील गरीब महिलांना श्री मीनाक्षी फाउंडेशनतर्फे गॅस संचाचे वाटप करण्यात आले.

शिवसेना शहापूर भिवंडी मुरबाड संपर्कप्रमुख व श्री मीनाक्षी फाउंडेशनचे अध्यक्ष विष्णू चंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या गॅस संचाचे व विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम १४ जुलैला कांदळी आयोजित करण्यात आला होता. यात १५० गरीब महिलांना गॅस व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. 

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख व महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, पांडुरंग बरोरा, शहापूर तालुकाप्रमुख मारुती धीर्डे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा जाधव, समाजकल्याण सभापती संगीता गांगड, महिला व बालकल्याण सभापती सपना भोईर, समाजकल्याण न्यास अध्यक्ष सोन्या पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विलास पाटील, सचिव मनोहर ठाकरे, उद्योजक सुभाष कथोरे, रवींद्र विशे, राजेश फाफे, सरपंच रोहिणी चंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती वैशाली चंदे यांचा सत्कार करण्यात आला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZQCCC
Similar Posts
भादाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उर्मिला भालेकर भिवंडी : राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या व पाच गावांमध्ये विस्तार असलेल्या भादाणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या उर्मिला रमेश भालेकर यांची आठ जानेवारी २०१९ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापतीपदी वैशाली चंदे बिनविरोध पडघा : भिवंडी तालुक्यातील पडघा विभागातील बोरीवली जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या वैशाली विष्णू चंदे यांची ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
समतानगर जिल्हा परिषद शाळेत जिजाऊ जयंती साजरी भिवंडी : शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना महामानवांचा इतिहास माहिती व्हावा व त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा या हेतूने भिवंडी तालुक्यातील बोरीवली-समतानगर जिल्हा परिषद मराठी शाळेत राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
पडघा येथे लोकशाही उत्सव साजरा भिवंडी : लोकशाहीचे महत्त्व घराघरात पोहोचविण्यासाठी भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामपंचायतीच्या सभागृहात लोकशाही उत्सव साजरा करण्यात आला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language